ताज्या घडामोडी

गॅस सिलेंडर चा जिल्ह्यात तुटवडा नाही! जनतेने विरोधकाच्या अफवावर विश्वास ठेवू नये* खा अनुप धोत्रे

Akola B7 News

*गॅस सिलेंडर चा जिल्ह्यात तुटवडा नाही! जनतेने विरोधकाच्या अफवावर विश्वास ठेवू नये* खा अनुप धोत्रे

 

अकोला जिल्ह्यात गॅस सिलेंडर चा तुटवडा असल्याच्या अफवा विरोधक जाणूनबुजून पसरवत असून त्याच्या अफवावर सर्वसामान्य लोकांनी विश्वास ठेवू नये तसेच जिथे कुठं गॅस चा तुटवडा आहे असे गॅस एजन्सी धारक सांगत असतील तर थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन आज खा अनुप धोत्रे यांनी केले   ते बाळापूर येथे दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रम प्रसंगी उत्सव मंगल कार्यालय बाळापूर येथे आज बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकार अनेक लोकांभिमुख योजना राबवित आहे त्यामुळे विरोधकांकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत त्यामुळे सरकारची बदनामी करण्यासाठी काहीतरी मुद्दे उकरून काढत आहे गॅस सिलेंडर टंचाई हा त्यातीलच एक मुद्दा आहे अकोला जिल्ह्यात पुरेसा गॅस सिलेंडर चा साठा उपलब्ध असून कुठेही टंचाई नाही आणि जर गॅस एजन्सी धारक कुठे टंचाई आहे असं सांगत असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना केले तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबध असून एखाद्या आजारावर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी सुविधा उपलब्ध नसेल तर नागपूर येथे एम्स ला उपचारासाठी रुग्ण पाठवून उपचार सुविधा उपलब्ध करून देऊ त्या दवाखान्यातील समितीमध्ये मी आहे अशी माहिती देखील यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना खा धोत्रे यांनी यावेळी दिली तसेच आगामी काळात होणाऱ्या जि प पं स निवडणूकित ग्रामीण भागात विकासासाठी भाजप ला सत्तेत आना असं आवाहन केलं या अभियान कार्यक्रमाला जिल्ह्यध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा निवडणूक प्रमुख ड्रा अमित कावरे, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, राजेश नागमते, अंबादास उमाळे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे, जेष्ठ भाजप नेते रामदास लांडे, जिल्हा सचिव विलास पोटे, उमेश जाधव,दिलीप पटोकार, तालुका अध्यक्ष किशोर कुचके, नितीन लांडे, सरचिटणीस राजेश्वर वैराळे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत माळी,सुनील मानकर,संजय देऊळकर, सुनील ठोकणे,ज्ञानेश्वर भगत, किशोर टिकार, विष्णु वराळे, सुभाष धुमाळे, गजानन कराळे, रवींद्र अवतीरक,सचिन खोट्टे, ज्योती टाले, अर्चना मसने,छया मानकर, यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.