डॉक्टरांन वरील हल्ल्याचा निषेध करत भाजपा वैद्यकीय आघाडी तर्फे निवेदन सादर
Akola B7 News
डॉक्टरांन वरील हल्ल्याचा निषेध करत भाजपा वैद्यकीय आघाडी तर्फे निवेदन सादर
अकोला स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे मागिल काळात डॉक्टरांन वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी अकोला महानगर तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शामकुमार सिरसाम यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व वैद्यकीय आघाडी चे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. किशोरजी मालोकार सर, महानगर अध्यक्ष डॉ. राजु देशपांडे, अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. अमित कावरे, डॉ. पार्थसारथी शुक्ला, डॉ. सुजित फोकमारे, डॉ. अजयसिंह चौहान, डॉ. विक्रांत इंगळे, डॉ. नरेश गोंड, डॉ. तुषार माळोकार, डॉ. तुषार चरखा, डॉ. विजय शर्मा, डॉ. वैभव देशमुख, डॉ. मनोहर चाकोते व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, रेसिडेंट डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.