ताज्या घडामोडी

अकोला महानगर तसेच जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त भागाचा संदर्भात विशेष टँकरच्या दृष्टीने व्यवस्था नियोजन करण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी दिनेश जोशी त्यांनी केली आहे

Akola B7 News

अकोला

मार्च महिन्यापासून उन्हाळा चा तापमान वाढत आहे आणि या दृष्टीने उष्माघाता ची बळी जाऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक अकोला मेडिकल कॉलेज अभ्यास समितीचे सदस्य गिरीश जोशी यांनी भाजप नेते व समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे मागणी करून मेडिकल कॉलेजमध्ये तसेच जिल्ह्यात उष्माघात विशेष कक्ष उघडण्याची मागणी केली होती या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी ताबडतोब दाखल घेऊन अकोला शहर आणि जिल्ह्यात उष्माघाताचे आजार ग्रस्तांना ताबडतोब उपचार मिळावा यासाठी त्यांच्यासाठी अकोला मेडिकल कॉलेजमध्ये 30 बेड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाच बेड राखीव ठेवून ग्रामीण रुग्णालय ची व्यवस्था करण्याची निर्देश दिले होते यासंदर्भात जिल्हाधिकारी वर्षाताई मीना यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाला या सूचना देऊन गिरीश जोशी यांची मागणीची पूर्तता केल्याबद्दल गिरीश जोशी यांनी आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे जिल्हाधिकारी वर्षाताई मीना यांचे आभार व्यक्त करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलले असून अकोला जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई होऊ नये या दृष्टीने सुद्धा ताबडतोब बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात यावी अशी मागणी गिरीश जोशी यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी पालकमंत्री आमदार खासदार महापौर यांच्याकडे मागणी केली आहे.

अकोला महानगर तसेच जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त भागाचा संदर्भात विशेष टँकरच्या दृष्टीने व्यवस्था नियोजन करण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.