ताज्या घडामोडी

गुरू रविदास चँरीटेबल ट्रस्ट अकोला तर्फे सावित्रीबाई फुले स्मृति दिना निमित्त आदरांजली

Akola B7 ज्ञानेश्वर निखाडे

*🌹गुरू रविदास चँरीटेबल ट्रस्ट अकोला तर्फे सावित्रीबाई फुले स्मृति दिना निमित्त आदरांजली*🌹

अकोला ः मनुस्मृतीच्या प्रचंड वर्चस्वाला झुगारून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, प्रत्यक्ष सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा १२९ वा स्मृती दिवस, गुरु रविदास चँरीटेबल ट्रस्ट अकोला यांच्या माध्यमातून मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी इन्फिनिटी कोचिंग क्लासेस हाँल अकोला येथे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आयोजीत करण्यात आला होता प्रथम दिपप्रज्वन करून सावित्रीमाईच्या फोटोला हारापँण करून रितसर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.सखुताई वानेडकर होत्या. प्रमुख पाहुणे वक्त्या सौ रुपाली ताई राजेश वाकोडे शिवर

मा. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला तथा पंचायत समिती सदस्या, सौ मधुताई पानझाडे माजी सैनिक पत्नी, अँड.बेलुरकर मंचावर विराजमान होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम शेगोकार सर यांनी केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले ह्याच्या स्मृतिदिनी स्त्री शक्तीचा सत्कार करण्यात आला. समाजसेविका कवयित्री कलावंत अँड. निवेदिता बेलूरकर मॅडम ह्याचा सत्कार करण्यात आला. तसेच एम ए मराठी विषयात अमरावती विद्यापीठात सातव्या मेरिट तसेच U.G.C. मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण सौ.दीपाली ओमप्रकाश राखोडे ह्याचा सत्कार करण्यात आला.सस्थेला नेहमी तन मन धनाने मदत करणारे दानशूर व्यक्तीमत्व इन्फिनिटी कोचिंग क्लासेस संचालक, सिविल इंजिनियर, समाजसेवक श्री राहुल अशोकराव शेगोकार सर ह्याचा सत्कार गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट अकोला अध्यक्ष श्री मधुकर वानेडकर , उपाध्यक्ष पांडुरंग वाडेकर उपाध्यक्ष निरजंन गव्हाळे सचिव मधुसूदन गव्हाळे ह्यांनी केला. त्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई ह्याच्या जीवनकार्यावर

नारायण वानरे सर रामभाऊ ताजने सर पांडुरंग वाडेकर सर श्रीराम राखोडे सर हर्षाताई निंबाळकर ह्यांनी आपले विचार प्रगट केले.कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या सौ रुपाली ताई राजेश वाकोडे शिवर

मा. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला मा. पंचायत समिती सदस्य ह्यांनी सावित्रीबाई फुले ह्यांच्या जीवन आणि कार्याचा संपूर्ण परिचय दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सखुताई वानेडकर यांचे अध्यक्षिय भाषण झाले

अल्पोपहार नंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमास प्रामुख्याने मधुकर वानेडकर, निरंजन गव्हाळे, श्रीराम राखोंडे, सुखदेव राऊत, महादेव इंगळे,महादेव पद्मने, सौ अनिता वानरे, सचिन वानेडकर,सौ सखुबाई वानेडकर, सौ. दिपाली राखोंडे, सौ अनिता वानरे, मधुसूदन गव्हाळे सौ.दिपाली राखोंडे ,ओ एस राखोंडे पांडुरंग वाडेकर, धनंजय खिराडे, नारायण वानरे, भास्कर शिरभाते, योगेश इंगळे,सौ. कमला वानरे रामभाऊ ताजणे, खंडूजी पद्मने, प्रल्हाद डांबरे,सौ रत्ना डांबरे, गजानन वानरे,सौ. शारदा वानरे ,राम शेगोकार ,महादेव कळसकार, हर्षा निंबाळकर, मधुताई पांणझाडे, केटी पद्मने, असंख्य समाज बांधव भगीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शारदाताई वानरे यांनी केले. श्री मधुसूदन गव्हाळे यांनी आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.