ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्काराचा भव्य कार्यक्रम* 🪷

Akola B7

🪷 *भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्काराचा भव्य कार्यक्रम* 🪷

महिला सशक्तीकरण आणि स्वरोजगर मार्गदर्शन या विचाराने भारतीय जनता पार्टी तर्फे जागतिक महिला दिन अकरा मार्च भाजपा कार्यालय साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सौ डॉ. राधिकाताई केळकर, सौ वैशालीताई देशपांडे. (राष्ट्रसेविका समिती कार्यवाही ), स्वाती काचकर (बचत गट उद्योजिका) या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुहासिनीताई धोत्रे, प्रमुख उपस्थिती सौ गंगा भाभी शर्मा, सो मंजुषाताई सावरकर,सौ समीक्षा ताई धोत्रे, महापौर सौ शारदा ताई खेडकर,सौ अर्चनाताई शर्मा,सौ सुनीता भाभी अग्रवाल सौ सीमा ताई मांगटे पाटील, सौ.आरती ताई शर्मा महिला अध्यक्ष वैशालीताई शेळके , सौ चंदाताई शर्मा, सौ ऋचा शहा (पाटील),सौ आरती घोगलिया,(महिला व बालकल्याण सभापती)सौ रश्मी अवचार (झोन सभापती)यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

डॉ. राधिका केळकर मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत आहे.त्या महिलाना संबोधन करत त्यांनी सांगितले

माझा ठाम विश्वास आहे की मानसिक आरोग्याची काळजी आजारपण झाल्यावर नव्हे, तर त्याच्या खूप आधीपासून सुरू व्हायला हवी.

सुरक्षित, आत्मविश्वासू आणि भावनिकदृष्ट्या मजबूत मुलांचे संगोपन केल्याने आपण भविष्यात एक निरोगी समाज घडवू शकतो.

सौ स्वाती काचकर महिला उद्योजिका यांनी बचत गटा मार्फत आपण कशाप्रकारे घरगुती वस्तूंपासून कशाप्रकारे उद्योग करू शकतो हे सांगितले.

सौ वैशालीताई देशपांडे यांनी महिलांना राष्ट्रप्रेम, आणि महिला स्वसंरक्षण कशाप्रकारे करावे याचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात चालता बोलता सारखे प्रश्नावली सो ममता सारडा यांनी घेतली आणि महिलांना बक्षीस देऊन त्यांचे बौद्धिक आणि मनोरंजनात्मक प्रश्न विचारून महिलांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका यांचा सत्कार घेण्यात आला.

आदरणीय सौ सुहासिनीताई धोत्रे यांनी महिलांना “महिला सशक्तीकरण हा समाज विकासाचा मार्ग आहे” असा संदेश दिला.

त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निकीता देशमुख,सौ निशा कढी यांनी तर आभार प्रदर्शन सौ गायत्री गोगे यांनी केले.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अध्यक्ष तसेच संपूर्ण महिला मोर्चा यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात 500 अधिक महिलांची उपस्थिती होती. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम भाजपा कार्यालय येथे घेण्यात आला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.