ताज्या घडामोडी

विदर्भासाठी अभिमानाची बातमी : पंकज कोठारी नारेडको महाराष्ट्राचे संयुक्त सचिवबांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाला राज्यस्तरीय जबाबदारी जयपूर येथील कार्यक्रमात नियुक्ती जाहीर; विदर्भाच्या रिअल इस्टेट विकासाला मिळणार नवी गती

Akola B7

विदर्भासाठी अभिमानाची बातमी : पंकज कोठारी नारेडको महाराष्ट्राचे संयुक्त सचिवबांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाला राज्यस्तरीय जबाबदारी जयपूर येथील कार्यक्रमात नियुक्ती जाहीर; विदर्भाच्या रिअल इस्टेट विकासाला मिळणार नवी गती

अकोला : देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य व प्रभावी संस्था असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्र यांच्या व्यवस्थापन समितीवर अकोल्यातील उद्योजक, चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर व बांधकाम क्षेत्रातील अनुभवी बिल्डर-डेव्हलपर पंकज रमेशचंद्र कोठारी यांची संयुक्त सचिव (Joint Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात नारेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत शर्मा, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर तसेच चेअरमन एमेरिटस डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नारेडको ही संस्था भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Housing & Urban Affairs) मार्गदर्शनाखाली कार्यरत असून रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रमुख राष्ट्रीय संघटना म्हणून ओळखली जाते. देशभरातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील रिअल इस्टेट विकासक, बांधकाम व्यावसायिक, गुंतवणूकदार तसेच संबंधित उद्योग क्षेत्रातील घटकांना एकत्र आणून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नारेडको कार्यरत आहे. सध्या राष्ट्रीय, राज्य व शहर स्तरावर मिळून नारेडकोचे देशभरात दहा हजारांहून अधिक सदस्य कार्यरत आहेत.

कोरोनानंतर देशात वेगाने वाढत असलेले शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगक्षेत्र, शासन व विविध हितधारकांमध्ये समन्वय साधत बांधकाम क्षेत्रातील समस्या, धोरणात्मक मुद्दे आणि विकासाच्या संधी यावर नारेडको सक्रियपणे काम करत आहे. अशा महत्त्वाच्या संस्थेच्या राज्यस्तरीय व्यवस्थापन समितीवर पंकज कोठारी यांची निवड होणे हे अकोला तसेच विदर्भासाठी अभिमानास्पद मानले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील तसेच विदर्भातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास नारेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पंकज कोठारी हे अकोल्यातील नामांकित उद्योजक, चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर, बिल्डर, मार्गदर्शक व व्यवस्थापन सल्लागार असून रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान व शिक्षण या विविध क्षेत्रांत त्यांना सुमारे ३८ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी अनेक सामाजिक, व्यावसायिक व उद्योग संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावत विविध विकासात्मक उपक्रमांना चालना दिली आहे. ते नारेडको अकोला चे संस्थापक सदस्य असून राष्ट्रीय पातळीवर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना संघटित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भातील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रश्न राज्य व केंद्र शासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडले जातील तसेच या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंकज कोठारी यांच्या या नियुक्तीबद्दल अकोला शहरातील उद्योग, व्यापार व बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.