शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधीमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठीत केली असून राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पिक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर करत आहोत.’