आज जागतिक महिला दिनानिमित्त वॉकेथॉन; दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेतून सुरुवात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते शुभारंभ; महिला-पुरुषांनी सहभागी होण्याचे आवाहन
Akola B7
आज जागतिक महिला दिनानिमित्त वॉकेथॉन; दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेतून सुरुवात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते शुभारंभ; महिला-पुरुषांनी सहभागी होण्याचे आवाहन
अकोला, दि. ६ : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे दि. ६ मार्च रोजी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद परिसरातून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वॉकेथॉनची रॅली जिल्हा परिषद येथून सुरू होऊन अशोक वाटिका, हुतात्मा स्मारक व नेहरू पार्क या मार्गाने पुढे जाईल. हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या वॉकेथॉनमध्ये अधिकाधिक महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.