ताज्या घडामोडी
पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड
Akola B7
पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड
इराण-इस्रायल युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव मध्यरात्री वाढणार असल्याच्या अफवेने अमरावती, नांदेड, परभणी, छ. संभाजीनगर आणि हिंगोलीत इंधन भरण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपांवर मोठी झुंबड उडाली. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने वाहनधारकांनी रात्रीच रांगा लावून टाक्या फुल केल्या, तर अनेक जण कॅन घेऊन पेट्रोलसाठी पंपावर आले होते. दरम्यान इंधनाचा मोठा साठा उपलब्ध असल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितलं आहे.