ताज्या घडामोडी
अमरावतीतील पिंपळोद गावात ७५ वर्षांपासून साजरी केली जात नाही होळी; काय आहे कारण?
Akola B7
अमरावतीतील पिंपळोद गावात ७५ वर्षांपासून साजरी केली जात नाही होळी; काय आहे कारण?
पिंपळोद (अमरावती) येथे गेल्या ७५ वर्षांपासून होळी पेटत नाही आणि धुळवडही साजरी केली जात नाही. २२ मार्च १९५१ रोजी या गावातील संत परशराम महाराज यांचे देवासन झाले. योगायोगाने त्यावेळी होळी पौर्णिमेचा दिवस असल्याने आपल्या लाडक्या संतांच्या निधनामुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आणि गावकऱ्यांनी त्या दिवसापासून होळी न पेटवण्याचा आणि रंग न खेळण्याचा निर्णय घेतला.