ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी अर्थ परिषद महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय, मुर्तीजापुर रोड बाबुळगाव तालुका अकोला,येथे पार पडली
Akola B7
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी अर्थ परिषद महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय, मुर्तीजापुर रोड बाबुळगाव तालुका अकोला,येथे पार पडली. या परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभेचे पक्षनेते अॅड. महेशभाऊ गणगणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत, विविध कृषी धोरणे, बाजारपेठेतील आव्हाने आणि शेतकरी हिताच्या उपाययोजनांबाबत सविस्तर व मुद्देसूद माहिती दिली.
तसेच, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अशा अर्थ परिषदांचे महत्त्व अधोरेखित करत, संघटितपणे पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.