जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी(मुली)ची व महीलांचा सत्कार
AB7 naineshwar nikaalen
जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी(मुली)ची व महीलांचा सत्कार
अकोला:-जागतिक महिला दिनानिमित्त महीलांचा सत्कार जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी रविदासिय महिला मंडळातर्फे, प्रमिलाताई ओक हॉल येथे महिला मेळावा संपन्न होत आहे. त्यानिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थिनी(मुली) ज्या शैक्षणिक सत्र 2024 -25 मध्ये दहावी,बारावीच्या परीक्षेमध्ये 95 टक्के ते 100% दरम्यान गुण मिळवून अव्वल आलेल्या आहेत. अशा गुणवंत विद्यार्थिनींची सत्कार तसे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित केला आहे .या महिला मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे हास्यसम्राट श्री किशोरजी बळी यांचा भन्नाट विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमाला अवश्य येण्याचे करावे असे आवाहन कल्याणीताई पदमणे रविदासिय महीला मंडळातर्फे करण्यात आले आहे.