कायम भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काही तत्व अकोल्यात सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असतात त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा आरोपी आणि त्याला त्यांचं चाललं तर ते जिवंत मारण्यापर्यंत मजल जाऊ शकते अशी प्रवृत्तीचे तत्व सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लिखाण करत राहतात.
Akola B7
कायम भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काही तत्व अकोल्यात सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असतात त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा आरोपी आणि त्याला त्यांचं चाललं तर ते जिवंत मारण्यापर्यंत मजल जाऊ शकते अशी प्रवृत्तीचे तत्व सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लिखाण करत राहतात.
भारतीय जनता पक्ष त्यांची दखल घेत नाही परंतु आरोप करणारे तत्व यांनी आपली प्रवृत्ती, आपल्या कृती, आपली मनोवृत्ती प्रदर्शन करत असतात.
भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला न्याय देण्याची प्रक्रिया आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास या प्रवृत्तीने कार्यरत राहते आणि भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक बदल दर तीन वर्षांनी होत राहतात प्रत्येकाला त्याच्या कर्तुत्वाची संधी मिळावी संघटनेचा विस्तार व्हावा या दृष्टीने कार्य राहतात आणि एका व्यक्तीकडे अनेक पद नसावे ही भूमिका भारतीय जनता पक्षाची असते आणि त्याच दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय जागतिक बँकेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातील 19 जिल्हे 925 गावांच्या कल्याणासाठी खारपान पट्ट्याचा विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना याच्या सह अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण भागाच्या विकासासाठी पानद रस्ते च्या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करून मंत्री चा दर्जा देण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्र सह, नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या एस आर सपोर्ट समितीमध्ये आमदार रणधीर सावरकरांचा समावेश केला.
सभागृहामध्ये सरकारच्या वतीने बोलण्याची संधी सातत्याने त्यांना दहा वर्षापासून मिळत आहे सरचिटणीस म्हणून चार वर्षे त्यांनी काम केलं. सर्वांना संधी देण्यात यावी या दृष्टीने आणि सावरकर यांच्याकडे महत्त्वाच्या कामाचा व्याप पाहता लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षाचे विविध समित्यांमध्ये काम करताना वेळ मिळावा यामुळे पक्षाने नव्यांना संधी दिली.
परंतु अकोला महानगरपालिका च्या नावावर आमदार सावरकर आणि भारतीय जनता पक्षाची विरोधक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सातत्याने टीका करण्याची संधी पाहतात त्यांनी ही संधी पाहून आपल्या शंकुचित आणि भाजप विरोधातील भूमिका सातत्याने प्रगट केली आहे त्यापैकी स्वतःला वेगळे समजणारे परंतु सगळ्या गोष्टी पुढे असणारे, प्रवृत्तीचा आणि कृतीचा लवकरच आम्ही भंडापूर करू. मर्यादा आणि संयम आणि विश्वास टीका सकारात्मक घेऊन भारतीय जनता पक्ष वाटचाल करत असताना जाणून-बुजून भारतीय जनता पक्ष लाच बदनाम करण्याची कृती ही अशोभनीय आहे.
दुसऱ्यावर टीका करताना आपल्यावरही टीका होऊ शकते आणि आपली कृती आपल्या कडे सुद्धा चार बोटे दाखवता येऊ शकतात याचा भान त्यांनी ठेवावा हीच विनंती