सोलापुरात पत्नी नांदायला येत नसल्याने व्हिडीओ करत तरुणाने केली आत्महत्या
सोलापुरात पत्नी नांदायला येत नसल्यामुळे हिप्परगा येथील प्रेम जाधव याने मध्यरात्री १२ च्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमचा एका वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. २ महिन्यांपूर्वी त्याला एक मुलगीही झाली, मुलीच्या डिलिव्हरीसाठी पत्नी माहेरी गेली होती, मात्र ती पुन्हा सासरी येण्यास नकार देत होती. आत्महत्येआधी प्रेमने पत्नीला व्हिडीओ केलेला आणि पत्नीला एक ऑडिओ संदेशही पाठवला होता.