ताज्या घडामोडी

अकोल्यात कृष्ण-राम भक्तांची अनोखी फुलांची होळी; सामाजिक समरसतेचा संदेश मोठे राम मंदिरात पारंपरिक नैसर्गिक रंगोत्सवाचा प्रारंभ; भजन-कीर्तनात भक्त मंत्रमुग्ध

Akola B7

अकोल्यात कृष्ण-राम भक्तांची अनोखी फुलांची होळी; सामाजिक समरसतेचा संदेश मोठे राम मंदिरात पारंपरिक नैसर्गिक रंगोत्सवाचा प्रारंभ; भजन-कीर्तनात भक्त मंत्रमुग्ध

 

अकोला : संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र मानल्या जाणाऱ्या मोठे राम मंदिर येथे कृष्ण व राम भक्तांच्या सहभागातून अनोख्या फुलांच्या होळी उत्सवाचा शुभारंभ उत्साहात झाला. ‘होली के रसिया’च्या गजरात आणि ढोल-वादनाच्या निनादात वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. या उपक्रमातून सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला. वृंदावन-मथुरा येथील परंपरेप्रमाणे नैसर्गिक रंग व फुलांच्या होळीची संकल्पना सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी विविध धार्मिक-सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून सुरू झाली. श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था, श्रीराम हरिहर संस्था, पुष्करणा चेतना समिती आणि श्रीराम नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातृशक्ती, युवाशक्ती व सर्व समाजघटकांच्या सहभागातून हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर अध्यक्षा सुमनदेवी अग्रवाल यांच्या हस्ते श्रीराम व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध पुरोहित व समाजप्रतिनिधींनी वेदमंत्रोच्चारात पूजा-अर्चा केली. त्यानंतर “होली के रसिया”, “श्याम आज बिरज में होली”, “राधाराणी” आदी भक्तिगीतांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले. खामगावहून आलेल्या गायकांनी व राधाकृपा सत्संग मंडळाने सादर केलेल्या भजनांनी कार्यक्रम रंगतदार झाला.

गिरीश जोशी यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या परंपरेला गिरीराज तिवारी, अनिल मानधने, विलास अनासने आदींच्या सहकार्याने सातत्य मिळाले आहे. अनेक स्वयंसेवक, कलाकार, ढोलकवादक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सेवा देत कार्यक्रम यशस्वी केला. महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. दहा दिवस उत्सवाची मालिका

शहरातील विविध ठिकाणी पुढील दहा दिवस हा उत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांसह साजरा होणार असून रामभक्त व कृष्णभक्त मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. फुलांची उधळण, भक्तिगीते आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा झालेला हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.