बाळापुरात अनधिकृत वीटभट्ट्यांवर कारवाईचा बडगा कधी उगारणार?विनापरवानगी बिनबोभाटपणे व्यवसाय : तीन वर्षांत एकाही वीटभट्टीवर कारवाई नाही
AB7
बाळापुरात अनधिकृत वीटभट्ट्यांवर कारवाईचा बडगा कधी उगारणार?विनापरवानगी बिनबोभाटपणे व्यवसाय : तीन वर्षांत एकाही वीटभट्टीवर कारवाई नाही
बाळापूर : तालुक्यात प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैध वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हजारो ब्रास माती तसेच पारस औष्णिक वीज प्रकल्प येथील राख वापरून शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडविला जात असल्याचा आरोप होत आहे. गौण खनिज उत्खनन, प्रकल्पाचे पाणीवापर, तसेच हिरव्या वृक्षतोडीद्वारे इंधनाचा गैरवापर सुरू असतानाही गेल्या तीन वर्षात एकाही वीटभट्टीवर कारवाई झालेली नाही. अनधिकृत वीटभट्ट्यांवर प्रशासन कारवाईचा बडगा कधी उगारणार, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.अकोला जिल्ह्यात मागील काही वर्षात बांधकाम क्षेत्राचा मोठा विस्तार झाल्याने विटांची मागणी वाढली आहे. मात्र, या मागणीचा गैरफायदा घेत अनेक वीटभट्ट्या महामार्ग, ग्रामीण रस्ते, तसेच शासकीय व खासगी * जमिनीवर नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी न घेता ग्रामपंचायतीकडून ‘ना-हरकत’ घेऊन नगरपरिषद हद्दीतील गाझीपूर शेतशिवारातही वीटभट्टया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.बाळापूर परिसरातील विटभट्टी.कोणतीही अधिकृत परवानगी नाहीयाच ‘ना-हरकती’च्या आधारे कुंभार समाजाच्या नावावर माती वाहतुकीचे परवाने देण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नियमांनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी-शर्ती पूर्ण करूनच वीटभट्ट्यांना परवानगी दिली जाते; मात्र बाळापूर तालुक्यात एक-दोन अपवाद वगळता बहुतेक वीटभट्टीधारकांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही.माती, राखेची उचल कोणत्या आधारावर?बाळापूर तहसील कार्यालयानेही कोणत्याही वीटभट्टीला परवानगी दिलेली नसताना माती व राखडची उचल कोणत्या आधारावर केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वृक्षांची कटाई, प्रदूषणातही वाढतालुका क्रीडा संकुल व जिल्हा परिषद शाळेजवळही बिनदिक्कत भट्टया सुरू असल्याचे समजते. वीट भाजण्यासाठी हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई केली जात असून, कोळशाचा वापर केल्याने प्रदूषणातही वाढ होत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र एकाही वीटभट्टी मालकाने तहसील कार्यालयात जमा केलेले नाही. विनापरवाना वीटभट्टीवर कारवाई करण्याबाबत ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तपासणी सुरू आहे.