रंग उत्सव “होली का रसिया” आज अकोल्यात उत्साहातराम-कृष्ण भक्तांचा अनोखा भक्तीमय सोहळा; २५ वर्षांची परंपरा कायम
AB7
रंग उत्सव “होली का रसिया” आज अकोल्यात उत्साहातराम-कृष्ण भक्तांचा अनोखा भक्तीमय सोहळा; २५ वर्षांची परंपरा कायम
अकोला : शहराच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा व भक्तीचा संगम असलेला “रंग उत्सव — होली का रसिया” हा भक्तिमय कार्यक्रम आज रविवार (२२ फेब्रुवारी) दुपारी ३.३० ते सायं. ६ या वेळेत मोठे राम मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या मंदिर परिसरात हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावात रंगणार आहे.
हा कार्यक्रम श्रीराम हरिहर संस्था, राधाकृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती, श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था आणि रामनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत राम व कृष्ण भक्त वृंदावन-मथुरेच्या धर्तीवर नैसर्गिक रंग व फुलांनीच होळी साजरी करतात. धार्मिक वातावरण, भजन-कीर्तन, भक्तिगीत आणि फुलांच्या वर्षावात रंगणारा हा सोहळा शहरातील श्रद्धाळूंसाठी विशेष आकर्षण ठरतो. आयोजन समितीने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय रंगोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.