नागपुरात बारावीचा फिजिक्स अन् केमिस्ट्रीचा पेपर व्हाट्सअपवर फुटला, गुन्हा दाखल
नागपुरात बारावी विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर फुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीकडे मोबाईल सापडल्यानंतर हा प्रकार समोर आला. १५ विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तासाभरापूर्वीच पेपर आले होते. खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती समोर आली असून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.