ताज्या घडामोडी

आंतरराज्य चोरट्यांचा पर्दाफाश — रामदासपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाईडिक्कीतून ३ लाख चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक; २ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन साथीदार फरार

AB7

आंतरराज्य चोरट्यांचा पर्दाफाश — रामदासपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाईडिक्कीतून ३ लाख चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक; २ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन साथीदार फरार

 

अकोला : पोलीस स्टेशन रामदासपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत मोटरसायकलच्या डिक्कीतून ३ लाख रुपये चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत आरोपींकडून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी सुशांत जयंता बल्लाळ (वय ४२) यांनी तक्रार दिली की, त्यांनी स्टेट बँक मुख्य शाखा येथून चेकद्वारे ३,००,००० रुपये काढून ते आपल्या प्लेजर दुचाकी (MH 30V 7846) च्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर ते मित्रासह आयसीआयसीआय बँक येथे गेले असता डिक्की उघडल्यावर पैसे गायब असल्याचे आढळले. अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतून रक्कम लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २३५/२०२६ कलम ३०३(२) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी प्रशांत भास्कर गुजांळा (वय ३०, आंध्रप्रदेश) व डेनियला बैलप्पा गोगाला (वय ५३, आंध्रप्रदेश) यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले. आरोपींना हिंदी-इंग्रजी भाषा येत नसल्याने तेलगू दुभाष्याच्या मदतीने चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्यांनी चोरीतील ३ लाखांपैकी १ लाख रुपये दोन साथीदार घेऊन गेल्याचे सांगितले, तर उर्वरित २ लाख रुपये वाशिम रोडवरील एका बंद हॉटेलच्या मागे मातीच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवले होते. पोलिसांनी तेथून रक्कम जप्त केली. ही कारवाई अचिंत चांडक (पोलीस अधीक्षक), बी. चंद्रकांत रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक), सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शेळके, शिरीष खंडारे, प्रदीप जोगंदड, निलेश गायकवाड, दादाराव टापरे, श्याम मोहळे, अनिल धनभर, प्रियंका बागडे व माथुरी लाहोळे यांच्या पथकाने केली.

पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम वाहनात ठेवू नये व संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.