श्री शिवाजी विद्यालय येथे शिवजयंती उत्सव साजरा अकोला:-*श्री शिवाजी विद्यालय निंबा तालुका बाळापूर येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.* याप्रसंगी विद्यालयाचे
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
श्री शिवाजी विद्यालय येथे शिवजयंती उत्सव साजरा
अकोला:-*श्री शिवाजी विद्यालय निंबा तालुका बाळापूर येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.* याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत पावडे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री दादाराव वानखडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री विनोद धांडे सर श्री शिवशंकर उमाळे सर श्री एकनाथ राठोड सर श्री संतोष गिरी सर व कु. सुधा बाळसराफ मॅडम हेदेखील मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर भाषणे दिली तसेच गीत गायन व शिव गीतांवर आधारित नृत्य सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याप्रसंगी श्री उमाळे सर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे विविध गुण आत्मसात करून त्याचा स्वराज्य स्थापनेसाठी तसेच धर्मरक्षणासाठी वापर केला व आपल्या समाजाची व देशाची रक्षण केले याविषयी माहिती दिली. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पावडे सर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारून त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात सुधारणा करण्यासाठी व समाजाच्या भल्यासाठी करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यानंतर आज विविध भाषण नृत्य व गीत गायन स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद मोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री अनिल बढे सर यांनी केले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.