सर्व धर्मीय महामानव जयंती उत्सव समितीच्या वतीने तहसील परिसर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
सर्व धर्मीय महामानव जयंती उत्सव समितीच्या वतीने तहसील परिसर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
अकोला:-सर्व धर्मीय महामानव जयंती उत्सव समितीच्या वतीने तहसील परिसर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव इंगळे गुरुजी, प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारीडॉ.शरद जावळे, तहसीलदार कुणाल झालटे, नगरसेवक सागर भारुका, नगरसेविका विद्याताई सुभाष खंडारे, सामाजिक कार्यकर्ता सुनीलभाऊ शिरसाट, एडवोकेट दिपाली जानोरकर, हे होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून व हाराअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक मध्ये साहेबराव इंगळे गुरुजी यांनी सांगितले की महाराजांचे स्मरण व्हावे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण कार्य करावे. अशी जयंतीनिमित्त अपेक्षा करतो. महाराजांच्या कार्यप्रणालीची छाप बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वधर्मीया घेतलेली दिसून येते. तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी जनतेची कामे करावी हीच आजच्या जयंतीनिमित्त आपण दखल घ्यावी.
नगरसेवक सागर भाऊ यांनी यावेळेस मार्गदर्शनात सांगितले सर्वांगीण प्रभागाचा विकास करण्याची हमी दिली. तसेच महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळा इंग्रजी माध्यमातून सुरु करण्यात येतील असे सांगितले व बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाची रंगरंगोटी त्वरित करण्यात येईल व आजूबाजूचे अतिक्रमण त्वरित हटविण्यात येईल.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये येणारे प्रशासकीय कार्यालय व ऐरीयाचे विकास कामे त्वरित करण्यात येतील असे आश्वासन दिले व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव केला तसेच माजी नगरसेवक सुभाष खंडारे यांनी सुद्धा महाराजांच्या कार्याची उजळणी केली त्यानंतर सुनीलभाऊ शिरसाट यांनी छत्रपतींच्या कार्याचा व संरक्षणा करिता तयार करण्यात आलेल्या गडकिल्ल्यांचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उत्कृष्ट प्रभावीपणे एडवोकेट छगन खंडारे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन एडवोकेट प्रमोद रौराळे यांनी केले होते.
यावेळी तहसील परिसरातील वंडर स्टॅम्प विक्रेता देवानंद अंभोरे, कैलास भालेराव,सुधीर खडे,रवी विसपुते,एडवोकेट ज्योती ठाकरे, माधुरी इंगळे, उज्वल सावळे, विशाल तायडे, बाबासाहेब घुमरे, पत्रकार मनीष खर्च, जीवनभाऊ दारोकार, रघुनाथ जैन, धीरज ठाकूर, बबनरावप्रवीण ढोके, सुनंदा चांदणे, एडवोकेट इलियास शेखानी,मोहन ताकवाले, एडवोकेट देहलीवाले, मिलिंद बोरकर,दिलीप शिंदे,आठवले झेरॉक्स,संतोष झेरॉक्स, प्रकाश तायडे,उज्वल इंगळे,रोशन वाठोरे,अक्षय माने,प्रमोद गणवीर,अशोक पगुले, पंकज कांबळे, एडवोकेट राजश्री खंडारे, उर्मिलाताई गजभिये, कोमल ईश्वरकर, पवन कोकाटे, विशाल तायडे इत्यादी नागरीकांनी यशस्वी यशस्वी करण्याकरिता करण्याकरिता मोलाचे परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले.