ताज्या घडामोडी

स्वराज्य प्रेरणेचा जागर: शिवजयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजननव्या पिढीत शौर्य, पराक्रम व मूल्यांची रुजवणूक करण्याचा उपक्रममान्यवरांच्या उपस्थितीत शिवचरित्रावर आधारित नाट्यप्रयोग व विविध कार्यक्रम

AB7

स्वराज्य प्रेरणेचा जागर: शिवजयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजननव्या पिढीत शौर्य, पराक्रम व मूल्यांची रुजवणूक करण्याचा उपक्रममान्यवरांच्या उपस्थितीत शिवचरित्रावर आधारित नाट्यप्रयोग व विविध कार्यक्रम

 

अकोला : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि जीवनमूल्यांचा प्रेरणादायी संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत पदमानंद सभागृह, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, जुने शहर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमात शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रयोग, देशभक्तिपर सादरीकरणे व विविध सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असणार आहे.

या कार्यक्रमाला कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, महापौर श्रीमती शारदा खेडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, ॲड. किरण सरनाईक, आ.वसंत खंडेलवाल, आ.धीरज लिंगाडे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. नितीन देशमुख, आ. साजिद खान पठाण, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आयोजकांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शिवजयंतीच्या या प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व शिवरायांच्या कार्यातून राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि कर्तव्यभावनेचा संदेश आत्मसात करावा.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.