ताज्या घडामोडी

आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (वस्ताद)यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त मातंग समाज संघर्ष समिती च्या वतीने विनम्र अभिवादन 

ज्ञानेश्वर निकाळे ए बी सेवन करिता

आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (वस्ताद)यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त मातंग समाज संघर्ष समिती च्या वतीने विनम्र अभिवादन

अकोला :- स्थानिक रेल्वे स्टेशन चौक येथे भारतीय क्रांतिकारक आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे(वस्ताद)यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त मातंग समाज संघर्ष समिती च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम मातंग समाजाचे जेष्ठ नेते, मातंग समाज संघर्ष समितीचे समन्वयक रामदास तायडे व युवा नेते परिमल कांबळे यांनी आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून अभिवादन केले.यावेळी रामदास तायडे यांनीआद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे(वस्ताद) यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.

स्मुर्ती दिनानिमित्त यावेळी विष्णू शेलार,प्रकाश तायडे,भाऊराव साबळे, सुरेश जाधव, माजी नगरसेवक दिनकर रणबावळे, बाळासाहेब तायडे, विनोद खवेकर, संजय वानखडे, पत्रकार शैलेश वानखडे, सामाजिक कार्यकर्ता आबासाहेब सिरसाट, विमलबाई वानखडे, बाळू गायकवाड, शाम तायडे,राजेश खंडारे, उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.