वाशिममध्ये सामूहिक कॉपी; ५८७ विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई
वाशिमच्या टो येथील मैनागिरी विद्यालयात बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरवेळी सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या भरारी पथकाने धाड टाकत ५८७ विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई केली. याप्रकरणी शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून ५० हून अधिक कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहे.