रिअल इस्टेट क्षेत्रात कायदेशीर जनजागृतीची गरज — अनुप धोत्रे रिअल इस्टेट लिगल अवेयरनेस संवाद कार्यक्रमात सल्लागार बांधवांशी साधला संवाद
अकोला : भारतीय रियल इस्टेट सलाहकार एजेंट वेलफेयर युनियन आयोजित रिअल इस्टेट लिगल अवेयरनेस संवाद कार्यक्रमात खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी सहभागी होऊन उपस्थित रिअल इस्टेट सल्लागारांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमात क्षेत्राशी संबंधित विविध कायदेशीर तरतुदी, ग्राहकांचे हक्क, व्यवहारातील पारदर्शकता तसेच एजंट्सच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्रात कायद्याची अचूक माहिती आणि जनजागृती वाढल्यास व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनतील. योग्य मार्गदर्शनामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल तसेच व्यावसायिकांना कायदेशीर अडचणींपासूनही संरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रिअल इस्टेट सल्लागार उपस्थित होते. संवादात्मक पद्धतीने प्रश्नोत्तर सत्रही घेण्यात आले, ज्यात सहभागी सदस्यांनी त्यांच्या व्यावहारिक अडचणी मांडल्या आणि त्यावर मार्गदर्शन मिळवले. आयोजकांनी अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम पुढेही नियमितपणे आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.