ताज्या घडामोडी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव रोशनी बंसल यांची पत्रकार परिषदेत माहिती

AB7

> *⚖️ शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा 22 फेब्रुवारीला शेलू वेताळ येथे*

 

> *“न्याय सब के लिए – सर्व समस्यांचे एकाच ठिकाणी निराकरण”; विविध विभागांचे स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध*

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव रोशनी बंसल यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

मुर्तिजापूर : नागरिकांच्या प्रलंबित शासकीय अडचणी सोडविणे आणि विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे या उद्देशाने रविवार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शेलू वेताळ येथील श्री वेताळ बाबा मंदिर परिसरात भव्य शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांच्या सचिव श्रीमती रोशनी बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा उपक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला, तालुका विधी सेवा समिती मुर्तिजापूर, अकोला जिल्हा वकील संघ तसेच विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे प्रशासकीय न्यायमूर्ती मा. अनिल स. किलोर यांच्या हस्ते होणार असून न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला जोशी-फलके प्रमुख उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष मा. शिवाजी भ. कचरे असतील. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, बार कौन्सिल सदस्य ॲड. मोतीसिंह मोहता, अकोला जिल्हा वकील संघ अध्यक्ष ॲड. अजय वाघमारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महामेळाव्यात कृषी, आरोग्य, शिक्षण, महसूल, पुरवठा, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सामाजिक वनीकरण, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापूर आदी विविध विभागांचे माहिती व सेवा असे एकूण 40 विभागाचे स्टॉल उभारले जाणार असून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज व समस्या यांवर तात्काळ मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार असून सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी आपल्या प्रलंबित शासकीय बाबींसाठी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही श्रीमती बंसल यांनी केले. संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला 8591903930 व तालुका विधी सेवा समिती मुर्तिजापूर – (07256) 242037 हे क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.