ताज्या घडामोडी

गौरक्षण रोडवरील ब्रीज वरील ‘वन-वे’ मोडणाऱ्यांवर लगाम; चुकीच्या बाजूने जाणाऱ्यांचे टायर होणार पंक्चर!एसपी साहेबाच्या बंगल्यासमोर विशेष स्पाईक बॅरिअर बसविण्यात; नियम पाळणाऱ्यांना कोणताही धोका नाही

AB7

गौरक्षण रोडवरील ब्रीज वरील ‘वन-वे’ मोडणाऱ्यांवर लगाम; चुकीच्या बाजूने जाणाऱ्यांचे टायर होणार पंक्चर!एसपी साहेबाच्या बंगल्यासमोर विशेष स्पाईक बॅरिअर बसविण्यात; नियम पाळणाऱ्यांना कोणताही धोका नाही

 

अकोला : शहरातील गौरक्षण रोडवरील ब्रीज वर वाहतुकीचे नियम मोडून चुकीच्या बाजूने (रॉंग साइड) जाणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. एसपी साहेबांच्या बंगल्यासमोर रस्त्यावर विशेष प्रकारची स्पाईक बॅरिअर यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे योग्य दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोणताही त्रास होत नाही; मात्र रॉंग साइडने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांचे टायर तत्काळ पंक्चर होतात. त्यामुळे अपघात टाळणे आणि शिस्तबद्ध वाहतूक राखणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. गौरक्षण रोड एस पी साहेबाच्या बंगल्यासमोरील हा परिसर वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. अनेकदा नागरिक वन-वे नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखावी. नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडच नव्हे, तर वाहनांचे नुकसानही होऊ शकते.

या नव्या यंत्रणेमुळे रस्त्यावर शिस्त प्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असी माहिती इंजिनीयर संदीप बाठे पीडब्ल्यूडी यांनी दिली

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.