रेणुराई गोंधळी समाजातील पहिले ज़िल्हा व सत्र न्यायाधिश श्री राहुल पवार यांची नियुक्ती..
सुनील पवार सटाणा
रेणुराई गोंधळी समाजातील पहिले ज़िल्हा व सत्र न्यायाधिश श्री राहुल पवार यांची नियुक्ती..
श्री, सखाराम झिपरू पवार सेवानिवृत्त न्यायाधीश यांचे ज्येष्ठ चिरंजीव एडवोकेट श्री, राहुल सखाराम पवार यांची मा, उच्च न्यायालय मुंबई यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाच्या 19 जानेवारी 2026 च्या अधिसूचनेनुसार सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी एडवोकेट श्री राहुल सखाराम पवार यांची बीड जिल्हा बीड येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी नियुक्ती/ नेमणूक झाली आहे. ते लवकरच पदभार स्वीकारतील. श्री राहुल सखाराम पवार हे गेल्या सतरा वर्षापासून नाशिक येथे जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करीत होते.
आणि त्याचबरोबर त्यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक Law instrucher,
(विधी निदेशक) पदावर निवड करण्यात आली होती आणि
संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक या संस्थेच्या संस्थांची न्यायालयीन बाजू मांडण्यासाठी संस्थांनी वकील म्हणून नियुक्ती केली होती,
श्री राहुल सखाराम पवार यांचे वडील श्री, सखाराम झिपरू पवार राहणार तांबोळे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून आता नाशिक बोरगड, (म्हसरूळ) येथे स्थायिक झालेले आहेत, ते महाराष्ट्र राज्यातील रेणुराई गोंधळी समाजातील पहिले वकील, व पहिले न्यायाधीश आहेत, आता ते सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत,
श्री राहुल सखाराम पवार यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पदापर्यंत पोहोचविण्यास नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील माननीय श्री एडवोकेट नंदकिशोर भुतडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,
श्री राहुल सखाराम पवार यांचे दुसरे बंधू श्री राजन सखाराम पवार हे मुंबई उच्च न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून दहा ते बारा वर्षांपासून महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट पद्धतीने काम पाहत आहेत,
श्री राहुल सखाराम पवार यांचे सर्वात लहान बंधू श्री पुरुषोत्तम सखाराम पवार हे नाशिक येथे टाटा स्टार्लिंग मोटर्स येथे H. R. Maneger म्हणून कार्यरत आहेत,
श्री राहुल सखाराम पवार यांच्या मातोश्री सौ, संजीवनी सखाराम पवार ह्या सुसंस्कृत गृहिणी आहेत, त्या गायकवाड परिवारातील स्व, देवराम लक्ष्मण गायकवाड सेवानिवृत्त बेलीफ मालेगाव न्यायालय, यांच्या चार नंबरच्या कन्या आहेत, तसेच
श्री राहुल सखाराम पवार यांच्या धर्मपत्नी सौ, किरण ताई राहुल पवार या पदवीधर असून गृहिणी आहेत श्री अशोकराव किसनराव जाधव राहणार जानेफळ, सेवानिवृत्त कर निरीक्षक चिखली नगरपालिका, यांच्या त्या कन्या आहेत.
श्री राहुल सखाराम पवार यांचे जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सर्वत्र क्षेत्रातून, समाजातून, अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,
श्री राहुल सखाराम पवार हे माझे मावसभाऊ आहेत.
राहुल भाऊ जिल्हा व सत्र न्यायाधीश झाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा…. 🌹✌️❤️🎈🎈🎈🚩🚩🙏
शब्दांकन
श्री, सुनील वसंतराव पवार सटाणा…. 🙏