37 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरकाँग्रेसचे नेते रेल्वेआंदोलनातून निर्दोष
अकोला.. जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे माजी आमदार हरिदासजी मध्ये माजी महापौर मदन भरगड तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोपालजी भीरड अँड विलास वखरे प्रकाश लक्ष्मणराव तायडे अनंतराव बगाडे माजी नगरसेवक नरेंद्र मोदीराज अजय रामटेके राजेश राऊत दिलीप दांदळे अँड दीपक काळपांडे विजय नरवाडे श्याम तिवारी किशोर गौरवे यांनी 1988 मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म चे दर दोन रुपये चे पाच रुपये केले आणि म्हणून अकोला जिल्हा काँग्रेसने रेल्वे मंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात अकोला रेल्वे स्टेशन येथे आंदोलन केले या आंदोलनावर तत्कालीन लाठी चार्ज होऊन अनेक लोक जखमी झाले.तत्कालीन मोर्चा वर कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली .1988 पासून सतत न्यायालयीन लढा देत आज रोजी सन्मानीय न्यायाधीश क्षीरसागर यांनी सर्वांना निर्दोष मुक्त केले यांच्यातर्फे वकील म्हणून मंदार विलास वखरे भूषण हागे ॲड ठाकूर यांनी काम पाहिले असून सर्व सतत एकत्रित येणारे काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी व तत्कालीन नेते यांनी निर्दोष झाल्यामुळे न्यायालय व्यवस्थेचे आभार व्यक्त करत जनतेच्या आंदोलनासाठी केलेल्या हा प्रदीर्घ लढा आमच्या जीवनातील एक मोठी आठवणीचा ठेवा आहे असा मत व्यक्त करत व एकमेकांना आनंदाने भेटत आज अकोला जिल्हा न्यायालयात उपस्थितीन मध्ये जुन्या काँग्रेस आंदोलनाच्या आठवणी इतिहास व स्मारणाला उजाळा दिला यामध्ये महेंद्र गवई प्रशांत प्रधान अनुराग काळपांडे सह अनेक सहकारी उपस्थित होते