सिल्लोडमध्ये पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून गळा आवळून केला खून
सिल्लोड तालुक्यातील घटनांद्रा येथे प्लॉट विक्रीच्या वादातून पत्नीने पतीची निघृण हत्या केली. मृत जेबास पठाण यांना घरच्या गरजांसाठी प्लॉट विकायचा होता, पण पत्नी रशिदाबीचा याला विरोध होता. वादादरम्यान रशिदाबीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून डोक्यावर प्रहार करून गळा आवळला. सोमवारी मध्यरात्री घडलेली ही घटना पहाटे उघडकीस आली. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला