ताज्या घडामोडी
४ मुलांच्या आईला दाखवले लग्नाचे आश्वासन; अहिल्यानगरात शारीरिक संबंधानंतर तरुण झाला पसार
AB7
४ मुलांच्या आईला दाखवले लग्नाचे आश्वासन; अहिल्यानगरात शारीरिक संबंधानंतर तरुण झाला पसार
फेसबुकवरून ओळख वाढवून प्रेम आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत ३३ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्यानंतर तरूण पसार झाल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. पीडित महिला विवाहित असून तिला ४ मुले आहेत. आरोपी तरुणाने महिलेला भेटण्यासाठी बोलावून त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एका लॉजवर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ‘चहा आणतो’ असे सांगून आरोपी महिलेचा मोबाईल घेऊन फरार झाला.