अजित पवारांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्त कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.