पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे, अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळला
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे, तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची निवड झाली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.