नागपुरात शासकीय रुग्णालयातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरनं हॉटेलमध्ये संपवलं आयुष्य
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील २६ वर्षीय निवासी डॉक्टर ऋत्विक ठाकूर यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋत्विक नुकतेच नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी रुजू झाले होते. ते महाविद्यालयात न आल्याने वडिलांनी हॉटेलशी संपर्क साधल्यावर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. गणेशपेठ पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.