तरी तू काहून राहत गटागटात रे, राय बाबू आता समाजाच्या पोटात रे’’या शिका संघटीत व्हा, संघर्ष करा या अल्बमचे लोकार्पण सोहळा संपन्न
AB7
‘‘तरी तू काहून राहत गटागटात रे, राय बाबू आता समाजाच्या पोटात रे’’या शिका संघटीत व्हा, संघर्ष करा या अल्बमचे लोकार्पण सोहळा संपन्न
अकोला – कवी आनंद पळसपगार लिखीत तुलसी प्रॉडक्शनद्वारे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा आणि संघटीत व्हा या अल्बमचा लोकार्पण सोहळा दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी जानोरकर मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. या अल्बमचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यीक आ.कि. सोनोने, विश्वनाथ शेगांवकर (IAS), डॉ. अरुण चक्रनारायण, अधीक्षक राजेश तेलमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य विद्यावर्धीनी महाविद्यालय धुळे तत्वचिंतक लेखक IAS बि. जी. वाघ, नाशिक से.नि. IFS सुरेश थोरात ठाणे, माजी शिक्षणाधिकारीछत्रपती संभाजी नगर चे डॉ. रमेश धनेगांवकर, मधुकर मेश्राम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आनंद पळसपगार लिखीत तुलसी प्रॉडक्शनद्वारे शिका संघटीत व्हा या अल्बमचे लोकार्पण होताच अनेकांना यु-ट्युबद्वारे अल्बम मधील गिते पाहुन आनंद झाला .या युट्यूब सबस्क्राईब केले त्यामधील दुसरे गीत गटागटात रे हे प्रसारित केले हे गीत आजच्या परिस्थितीशी साजेशी असून उद्बोधक आणि प्रेरणादायक आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावाअसे कवीआनंद पळसपगार यांनी कळविले आहे.