महापालिकेत महापौर व उपमहापौरांनी घेतला पदभार!
अकोला : महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर शारदा रणजीत खेडकर आणि उपमहापौर अमोल सुधाकर गोगे यांचा पदग्रहण सोहळा सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.या सोहळ्यास आमदार वसंत खंडेलवाल, सुहासिनी धोत्रे, मंजूषा सावरकर, माजी महापौर तथा नगरसेवक विजय अग्रवाल, नगरसेवक तथा भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, गटनेता पवनमहल्ले, नगरसेविका उषा विरक, माजी उपमहापौर सुनील मेश्राम, संग्राम गावंडे यांची उपस्थिती होती.यावेळी शहर सुधार आघाडीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभादरम्यान महापौर खेडकर व उपमहापौर गोगे यांचा मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी भाषणांतून शहराच्या सर्वागीण विकासासाठी नव्या नेतृत्वाने लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.