ताज्या घडामोडी
निवडणूक लढण्यासाठी तिसऱ्या अपत्याचा अडथळा, बापाने चिमुकल्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकून संपवलं
AB7
निवडणूक लढण्यासाठी तिसऱ्या अपत्याचा अडथळा, बापाने चिमुकल्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकून संपवलं
नांदेडमध्ये सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी अडथळा ठरणारी ‘दोन अपत्यांची’ अट पूर्ण करण्यासाठी निष्ठर पित्याने ६ वर्षांच्या मुलीची हत्या केली. मुखेडमधील आरोपीने मुलीला तेलंगणातील कालव्यात जिवंत फेकून दिले. निझामाबाद पोलिसांनी तपासाअंती मुलीची ओळख पटवून आरोपी पित्याला अटक केली आहे. आरोपीला तीन अपत्ये असल्याने तो निवडणूक कायद्यामुळे अपात्र ठरत असल्याने त्याने हे क्रूर कृत्य केल्याची कबुली दिली आहे.