विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्पः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रविवारी सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे टाकलेले एक दमदार पाऊल असून हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. ते पुढं म्हणाले, प्रत्येक ग्रोथ हबसाठी ५००० कोटी प्रत्येकी ५ वर्षांत प्राप्त होणार आहेत.