बीडमधील मच्छिंद्रनाथ देवस्थान परिसरात खोल दरीत आढळले दोन मृतदेह
बीडमधील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान परिसरातील गडावरील दरीत दोन पुरुषांचे मृतदेह आढळले आहेत. निलेश घोंगरे आणि दिनकर घडशिंग अशी मृतांची नावे असून, एक मृतदेह सांगाडा तर दुसरा कुजलेल्या अवस्थेत असून दरीतून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, निलेश महिनाभरापूर्वी गडावर दर्शनासाठी आला होता, मात्र तिथूनच तो गूढरित्या बेपत्ता झाला होता. अंभोरा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.