आर्थिक विवंचनेतून पोटच्या पोरीची हत्या; नांदेडमधील पित्याला अटक
नांदेड जिल्ह्यातील बाऱ्हाळी येथे पित्यानेच ७ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग कोंडामंगले याने मुलगी प्राचीला तेलंगणातील येडपल्ली येथील कालव्यात फेकून दिले. आर्थिक विवंचना आणि गरिबीमुळे हे कृत्य केल्याचा संशय आहे. पोलिसांनी चौकशीअंती पांडुरंगला ताब्यात घेतले असून तेलंगणा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, या घटनेने मुखेड तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.