ताज्या घडामोडी

जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीवदोन आरोपी ताब्यात : सिरसाळा शहरातील घटना

AB7

जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीवदोन आरोपी ताब्यात : सिरसाळा शहरातील घटना

 

सिरसाळा (जि. बीड) : अवघ्या २०० रुपयांच्या क्षुल्लक वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका ४० वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत घडली आहे. संजू गंगाराम उबदे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांनाताब्यात घेतले आहे.सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला.या धक्क्यामुळे संजू तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत याली त्यातच त्यांचा मत्य यालादंड ठरला वादाचे मूळया हत्येच्या घटनेमागे ‘जातपंचायती’ची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून सिरसाळ्यात जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधितांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही दंडाची रक्कम समाजबांधवांमध्ये वाटण्यात आली होती. मात्र, या वाटणीतील आणि एकमेकांना दिलेल्या उसने पैशांच्या हिशेबावरून (अंदाजे २०० रुपये) संजू उबदे यांचा पस्तमवाड यांच्याशी वाद झाला होता.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.