ताज्या घडामोडी

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीआज संध्याकाळी लोकभवनात शपथविधी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची दुपारी बैठक; दिवसभरात वेगवान राजकीय हालचाली, पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी

AB7

 

 

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीआज संध्याकाळी लोकभवनात शपथविधी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची दुपारी बैठक; दिवसभरात वेगवान राजकीय हालचाली, पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी

 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. ही निवड झाल्यावर लगेच संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा लोकभवनावर शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची दुपारी दोन वाजता विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधिमंडळ पक्षनेतेपद व उपमुख्यमंत्रिपदावर तातडीने नियुक्ती करण्याबाबत पक्षात चर्चा झाली. ही पदे जास्त काळ रिक्त ठेवली तर चर्चाना तोंड फुटेल अशी शक्यता लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर यासंदर्भात राजकीय हालचाली झाल्या. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यावर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा ?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अजित पवार यांच्याकडील वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केली. वित्त आणि नियोजन खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील, अशी चर्चा आहे.मात्र, वित्त आणि नियोजन खाते आपल्याच पक्षाकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. तसेच, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे.उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी रिक्त असलेले हे मंत्रिपद भरण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचेही समजते.दिवसभरात काय घडले?राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी याबाबत प्राथमिक चर्चा केली होती. तर शुक्रवारी सकाळी पटेल, तटकरे, भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन याबाबत चर्चा केली.२ या चर्चेनंतर शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल असे भुजबळ यांनी जाहीर केले. मात्र त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली नव्हती. त्यामुळे दिवसभर या बैठकीबाबत संभ्रम होता. अखेर रात्री आठ वाजता बारामतीवरून याबाबत स्पष्ट होकार आल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचा निर्णय झाला आणि विधिमंडळ सचिवालयाला बैठकीबाबत पत्र देण्यात आले.तसेच आमदारांना तसा निरोप देण्यास सुरुवात झाली. बैठक व शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीवरून शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत येण्यास निघाल्या होत्या.बारामतीत पोटनिवडणूकसुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा बारामतीमधून लढली होती. यात पराभव झाल्यानंतर त्यांना पोटनिवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावे लागेल. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या विधानसभेची निवडणूक लढवतील. ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.अजितदादांच्या जागेवर कोणाला बसवावे हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही जनभावना आणि आमदारांचे मत विचारात घेणार आहोत. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होईल.प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. जनतेच्या मनातले, आमदारांच्या मनातले आम्ही ठरवू. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.