ताज्या घडामोडी

खासदार औद्योगिक महोत्सव उद्यापासून

AB7

खासदार औद्योगिक महोत्सव उद्यापासून

नागपूर : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) यांच्यावतीने अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६ या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तीन दिवसीय आयोजन ६ फेब्रुवारीपासून अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात करण्यात येणार आहे.पत्रपरिषदेतअसोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे (एआयडी) अध्यक्ष आशिष काळे म्हणाले, उद्घाटन ६ रोजी सकाळी १० वाजता होईल. सोहळ्याचे अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री व खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रवर्तक नितीन गडकरी भूषवतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रोजगार मंत्री आकाश फुंडकर, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, उद्योग व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, अदानी समूहाचे संचालक जीत अदानी, महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर, पॉड रिकार्डइंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक जीन टोबूल, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह देशातील नामवंत उद्योजक उपस्थित राहतील. महोत्सव ‘एम्पॉवरिंग ग्रोथ’ या संकल्पनेवर आधारित आहे.तीन दिवसीय महोत्सव : ३७० स्टॉल, विविध विषयांवर चर्चासत्रआंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून, २३ हून अधिक देशांचे राजदूत व उद्योजक सहभागी होतील. परिषदेत संरक्षण, अन्नप्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, शिक्षण, स्टार्टअप्स, पेटंट्स व नवकल्पना, लॉजिस्टिक्स, पर्यटन व आदरातिथ्य, सेबी संबंधित विषय, कोळसा, पोलाद, औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन होणार आहे. याशिवाय तिन्ही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहील. याशिवाय गेमिंग झोन, नागपूर फूड फेस्टिव्हल, ई-व्ही एक्स्पो तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरण्यात आलेल्या ड्रोनद्वारे सादर होणारा ड्रोन शो ही विशेष आकर्षणे राहतील. पत्रपरिषदेत डॉ. विजय शर्मा, प्रशांत उगेमुगे, अविनाश घुसे, प्रा. राजेश बागडी, महेश साधवानी, अशोक गोयल, गिरधारी मंत्री, अनुप खंडेलवाल, प्रसन्न देशपांडे, कृपा सावलानी उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.