ताज्या घडामोडी
बारामतीत महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी भोंदूला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
Akola B7
बारामतीत महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी भोंदूला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून बारामतीमधील महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या मिलिंद जाधव या भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अघोरी पूजेच्या बहाण्याने त्याने महिलांवर अत्याचार केले होते. जिल्हा न्यायाधीशांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा निकाल दिला. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.