ताज्या घडामोडी
राज्यात आता फ्लॅटधारकांना मिळणार ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’; फसवणुकीला बसणार आळा
Akola B7
राज्यात आता फ्लॅटधारकांना मिळणार ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’; फसवणुकीला बसणार आळा
महाराष्ट्र सरकारने फ्लॅटधारकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेत ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ नियमावलीला मंजुरी दिली आहे. यामुळे आता प्रत्येक सदनिकेची सरकारी दप्तरी स्वतंत्र नोंद होणार असून इमारतीखालील जमिनीमध्ये फ्लॅटधारकाचा नेमका हिस्सा किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या पारदर्शकतेमुळे फसवणुकीच्या प्रकारांना कायमचा आळा बसेल.