घरगुती वादातून दीराची हत्या; अकोल्यात वहिनी आणि पुतण्याला बेड्या
अकोला जिल्ह्यातील वाई (माना) गावात ५० वर्षीय संजय भटकर यांचा नैसर्गिक वाटणारा मृत्यू प्रत्यक्षात खून असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. २६ मार्चला घडलेल्या या घटनेत, घरगुती वादातून वहिनी संगीता भटकर आणि पुतण्या स्वप्नील भटकर यांनी संजय यांचा गळा आवळून खून केला. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला होता, पण शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे स्पष्ट झाले. माना पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीय.