ताज्या घडामोडी

पत्नीचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Akola B7

 

 

पत्नीचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

 

अकोला : प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध २४ मार्च रोजी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाळापूर नाका, शांततानगर परिसरात उघडकीस आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती मयूर प्रकाश बुंदेले याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहेफिर्यादीत नमूद केल्यानुसार, विवाहितेचा विवाह जून २०२३ रोजी आर्य समाज मंदिर, अकोला येथे मयूर बुंदेले यांच्यासोबत प्रेमविवाह झाला. त्यानंतर किरकोळ कारणांवरून पती वाद घालत मारहाण करू लागला. पतीकडून वारंवार शिवीगाळ, चारित्र्यावर संशय घेणे, तसेच माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घरखर्चासाठी पैसे मागितल्यावर पतीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिला माहेरी निघून गेली असून, तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.