ताज्या घडामोडी
देशात पहिल्यांदाच ‘इच्छामरण’ मिळालेल्या हरीश राणा यांचा दिल्ली एम्समध्ये मृत्यू
Akola B7
देशात पहिल्यांदाच ‘इच्छामरण’ मिळालेल्या हरीश राणा यांचा दिल्ली एम्समध्ये मृत्यू
‘द प्रिंट’नुसार, भारतात निष्क्रिय इच्छामरण मिळवणारे पहिले व्यक्ती हरीश राणा यांचे मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ ते कोमात होते. २०१३ मध्ये चंदिगढ विद्यापीठात सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना, चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा ‘मरणाचा अधिकार’ मान्य केला होता.