ताज्या घडामोडी

वणी शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रंगनाथ स्वामी यात्रेच्या निविदा प्रक्रियेवर लवकरच उच्च न्यायालयात नागपूर येथे याचिका दाखल होणार

AB7

वणी शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रंगनाथ स्वामी यात्रेच्या निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप होत असून या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अधिक रक्कम देण्याची तयारी असतानाही कमी बोलीला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप पुढे आल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर संशयाची गडद छाया पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेच्या अनुषंगाने अम्यूझमेंट पार्क उभारणीसाठी नगर परिषदेकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत तीन संचालकांनी सहभाग घेतला होता. नागपूर येथील अम्यूझमेंट पार्कचे संचालक हर्षद भाटी यांनी सुमारे ६ लाख ३१ हजार रुपयांची बोली सादर केली होती. तर यवतमाळ येथील पूजा अम्यूझमेंट पार्कचे संचालक आनंद भेले यांनी ६ लाख रुपयांची बोली दिली. तसेच लक्ष्मी अम्यूझमेंट पार्कचे संचालक प्रवीण गोस्वामी यांनी ५ लाख रुपयांची बोली लावली होती. मात्र, या प्रक्रियेनंतर अचानक पुन्हा निविदा काढण्यात आल्याची बाब समोर आली. दुसऱ्या निविदेत केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाला आणि त्यालाच ७ लाख ५१ हजार रुपयांची मंजुरी

देण्यात आली. या निर्णयामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारदारांचा दावा आहे की, ते १० लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यास तयार होते. तरीही त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नगर परिषदेला लाखो रुपयांचे संभाव्य आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून गंभीर अनियमिततेकडे निर्देश करणारा असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. धार्मिक श्रद्धा आणि शहराच्या प्रतिष्ठेशी जोडलेल्या यात्रेच्या निविदेत जर अशा प्रकारच्या व्यवहारांचे सावट असेल, तर ते अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संघटनांनी दिली आहे. अनेक नागरिकांनी या प्रकरणातील संपूर्ण निविदा प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काही सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणामुळे वणी शहरात प्रचंड खळबळ उडाली असून यात्रेच्या निविदेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सदर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात असल्याचे अन्यायग्रस्त ठेकेदार हर्षद भाई भाटी प्रवीण गोस्वामी नागपूर यांनी कळविले

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.