ताज्या घडामोडी

मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातील तीन कर्मचारी निलंबित

Akola B7

मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातील तीन कर्मचारी निलंबित

 

अकोला, दि. १२ मार्च : अकोला महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नागरिकांना दाखले मिळण्यात होत असलेल्या विलंबाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी कडक पावले उचलली आहेत. विभागातील कामकाजात निष्काळजीपणा आढळून आल्याने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. यासंदर्भात गुरुवारी मनपा मुख्यालयात जन्म-मृत्यू विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अमोल गोगे तसेच सभागृह नेते पवन महल्ले यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीत नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले देण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेण्यात आली. सीआरएस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार नागरिकांना तातडीने दाखले देण्यात यावेत, तसेच रजिस्टरमध्ये नोंद नसलेल्या प्रकरणांवरही तत्काळ कार्यवाही करून अर्जदारांना लवकरात लवकर दाखले उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना कोणतेही ठोस कारण नसताना दाखल्यासाठी जवळपास महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने त्यांच्या कामातील हलगर्जीपणा स्पष्ट झाला. तसेच काही महिन्यांपूर्वी निबंधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मनीषा बोरेकर यांच्या नावाचे व स्वाक्षरीचे टोकन अद्यापही नागरिकांना देण्यात येत असल्याचेही आढळून आले, ही गंभीर बाब असल्याचे सभापती अग्रवाल यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर जन्म-मृत्यू विभागातील देवानंद तायडे, श्रीमती जामनीक आणि शरद डोंगरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून निलंबनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच डॉ. फवाज खान (कंत्राटी वैद्यकीय अधिकारी) आणि शेख सरफराज (लिपिक) यांच्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने त्यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांची बदली इतर विभागात करण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीस नगरसेवक सिद्धार्थ उपरवट, संदीप शेगोकार, मनपा उपायुक्त विजय पारतवार, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर, अफसर कुरेशी, संदीप गावंडे, किशोर वरोकार, मोहम्मद इलियास तसेच मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पहूरकर यांच्यासह जन्म-मृत्यू विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.